August 8, 2025

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संकल्प व्हॉलीबॉल क्लबच्या मुलींना सुवर्णपदक

  • कळंब- नेवासा येथे झालेल्या स्पेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्यस्तरी हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये कळंबच्या संघाने उपांत्य फेरीत अहमदनगरच्या संघावर मात करून अंतिम फेरीत रायगडच्या संघावर मात केली व राज्यस्तरीय स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले.
    एप्रिल मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.कळंबच्या मुली दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
    या यशामुळे संकल्प क्लबचे प्रशिक्षक रतन (काका) उबाळे यांचे व क्लबच्या खेळाडू तन्वी टोपे,साक्षी काळे,सृष्टी टोपे,सायली शिंदे,महेश्वरी जमादार आणि स्नेहा थोरबोले या मुलींचे यशवंत दशरथ,लक्ष्मण मोहिते, डॉ.साजेद चाऊस,डॉ.अभिजीत लोंढे,अँड.शरद जाधवर,अँड. तानाजी चौधरी,प्राचार्य जगदीश गवळी,महादेव शिंदे,आदिनाथ ठाणांबिर,दत्ता कवडे,सागर काकडे,सागर भडंगे,गणेश डोंगरे, गणेश करंजकर,शिवाजी शिरसाट,यशवंत टोपे,सचिन काळे,अनंत टोपे,समाधान शिंदे, नवनाथ थोरबोले,रामानंद जमादार यांनी कौतुक केले व दिल्लीमध्ये होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!