धाराशिव – असर व प्रथम यांनी केलेल्या गुणवत्ता पाहणी अहवालात धाराशिव जिल्ह्याने राज्यात नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल ओबीसी कर्मचारी व अधिकारी महासंघाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांचा शाल ,हार व अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. असर व प्रथम च्या पाहणीत धाराशिव जिल्हाची कामगिरी सर्वोत्तकृष्ट अशी राहिली आहे.गुणवत्ता अभियानात धाराशिव जिल्हा अग्रेसर झाला.यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील यांनी सुक्ष्म नियोजन केले होते.त्यामुळे आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात धाराशिव चे विद्यार्थी व गुणवत्ता अग्रेसर असल्याचे दिसून आले.राज्याची गुणवत्ता सरासरी ४८ च्या आसपास असताना धाराशिव जिल्हा ६१ वर पोहोचला आहे.जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणा, जमीन पातळीवर काम करत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नाला आलेले हे यश असल्याचे दिसून येते.याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात मा.शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,जिल्हाध्यक्ष संतोष भोजने,जिल्हाकार्यध्यक्ष दिपक हजारे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देवगिरे,शरद माळी,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पंकज कासार काटकर, जिल्हा संघटक शहाजी माळी, हे उपस्थित होते.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन