कळंब – संतांनी आपल्या साहित्य व किर्तन प्रवचनातून जे ज्ञान आपणास दिले आहे या ज्ञानामुळे माणसाच्या जीवनातील अंधकार नष्ट होतो व जीवनाला दिशा मिळते व प्रगती होते असे विचार शिवभक्त परायण उमाशंकर महाराज मिटकरी चुबळीकर यांनी कळंब येथील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मठ येथे आयोजित शिवनाम सप्ताहात किर्तन करीत असताना व्यक्त केले.संत श्री मन्मथ स्वामी महाराज मंदिर देवस्थान कळंब, आयोजित मन्मथ माऊलींच्या ४६८ व्या जन्मोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताहात दिनांक ३० जानेवारी रोजी शिवभक्त परायण श्री उमा शंकर महाराज मिटकरी चुंबळीकर यांची कीर्तन सेवा झाली,कळंब येथे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांचा मठ आहे. कळंबही स्वामींची जन्मभूमी आहे प्रतिवर्षी भक्त परिवाराच्यावतीने अखंड सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २ फेब्रुवारी रोजी अखंड शिवनाम सप्ताहाची समाप्ती होणार असून यानिमित्त कळंब शहरातून भव्य शोभायात्रा तसेच महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.किर्तन सेवा पूर्ण झाल्यानंतर शिवभक्त परायण उमाशंकर मिटकरी महाराजांचा राजाभाऊ आबा मुंडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शैलेश महाराज स्वामी,गजानन मुंडे,महारुद्र नक्षे, दत्ताभाऊ लोखंडे,अनिल कथले, भागवत किरवे,संजय मुंडे, शिवराज मेनकुदुळे,सुनील हिरे, नंदकिशोर आगलावे,मच्छिंद्र साखरे,सोमनाथ क्षिरसागर, महादेव आकुसकर,किशोर घेवारे,अर्जुन चिंचकर,संकेत मुंडे किरण फल्ले,नाना शिंगणापूरे यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले