कळंब – निजाम काळा पासून कळंब,भुम व वाशी तालुक्यातील जमीनीच्या दस्तांची नोंदणी चे रेकॉर्ड हे दुय्यम निबंधक कार्यालयात असून तिन्ही तालुक्यातील नागरिक आप आपल्या वेगवेगळ्या कारणांसाठी जमीन दस्त नोंदणी च्या नक्कल काढण्यासाठी कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रितसर अर्ज घेऊन येत असतात काही जणांना आपल्या जमिनी नोंदणी दस्ताची सत्यप्रत नक्कल ही तात्काळ पाहिजे असते तर काही जणांना दस्तांचे नंबर माहित नसते नागरिकांचे या अज्ञातेचे फायदा कळंब दुय्यम निबंधक कार्यालयात काही खाजगी व्यक्ती घेत आहेत. कळंब दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक वर्षांपासून काही खाजगी व्यक्ती हे स्वतः अधिकारी,कर्मचारी म्हणून कार्यालयाच्या अभिलेख (रेकॉर्ड)रूमच्या चाव्या स्वतः जवळ ठेवून सुटीच्या दिवशी ही ते कार्यालयाचे अभिलेख (रेकॉर्ड) रूम उघडून कार्यालयाचे अभिलेख तपासत असतात. संबंधित खाजगी व्यक्ती अधिकारी कर्मचारी म्हणून अनेक वर्षांपासून वारत आहेत येणाऱ्या अर्जदार कडून ५०० रूपये ते ५०००/- रूपये शोध फिस म्हणून घेतात जे अर्जदार कार्यालयातील खाजगी व्यक्ती अधिकारी, कर्मचारी यांना पैसे देत नाहीत त्यांना नक्कल लवकर मिळत नाही कर्जदारांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात या प्रकारा कडे संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत या प्रकरणाकडे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कडे कळंब च ॲड.समीर मुल्ला यांनी तक्रार दाखल करून दुय्यम निबंधक कार्यालयातील येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट व मानसिक त्रास थांबवावे या खाजगी व्यक्तींना दुय्यम निबंधक कार्यालयात मनाई करू बंधन करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले