कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चरिटेबल ट्रस्ट आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थामाता कै. सुमनबाई (आई ) मोहेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी केले.याप्रसंगी माजी विद्यार्थी टीव्ही नाईन वृत्तसंस्था मुंबईचे वृत्तनिवेदक सागर जोशी विद्यार्थी दशेतील अनुभव व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर उपप्राचार्य हेमंत भगवान,डॉ.के.डी.जाधव, प्रा.आप्पासाहेब मिटकरी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुनिल पवार उपस्थित होती. प्रारंभी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या आणि संस्थामाता कै.सुमनबाई (वहिनी) मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय गट सांस्कृतिक सभागृहात तर महाविद्यालय गटाची स्पर्धा जुनी अभ्यासिकामध्ये एकाच वेळी पार पडली.यावेळी संपादक सुभाष द.घोडके यांच्या साक्षी पावनज्योत कै.सुमनआई मोहेकर या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तर पारितोषिक वितरणप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनिल पवार, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.हरीदास फेरे,सौ.सीमाताई संदीप मडके (सरपंच मोहा) आणि ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांची उपस्थिती होती.यावेळी विजेत्यांना प्राचार्य डॉ.फेरे यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही गटातील विजेत्यांना प्रथम द्वितीय,तृतीय अनुक्रमे पाच उत्तेजनार्थ पारितोषिक स्वरूपात सन्मानचिन्ह,रोख राशी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. महाविद्यालय गट विजेते आणि प्रायोजक : बादुले सानिका इरापा (भानुदाराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा) (फिरत्या ढाल आणि संदीप मडके यांच्या तर्फे रू.सात हजार) बारस्कर आकाश सतीश, (मोहेकर महाविद्यालय), (प्रा.अक्षय खंडाळे यांच्या तर्फे रू.पाच हजार) आणि तृतीय पारितोषिक लिमकर प्रतीक्षा शिवाजी, रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा, (प्रा.विलास आडसूळ यांच्या तर्फे तीन हजार ) उत्तेजनार्थ वाघमारे अनुजा भीमराव (मोहेकर महाविद्यालय), सावंत हर्षदा भाऊसाहेब (मोहेकर महाविद्यालय), वाघमारे भाग्यश्री विजयसिंह (मोहेकर महाविद्यालय), साळुंखे स्नेहल कमलाकर (साई कॉलेज,रांजणी), गिल्डा संजीवनी कांतिलाल (भानुदाराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा) हे स्पर्धक विजेते ठरले. शालेय गट विजेते आणि प्रायोजक प्रथम पारितोषिक गुरव वसुंधरा संजय (समता माध्यमिक विद्यालय,धाराशिव) (उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या तर्फे सात हजार), द्वितीय पारितोषिक सोनवणे अमृता दत्ता (शारदा इंग्लिश स्कूल) (आदित्य मडके यांच्या तर्फे पाच हजार) आणि तृतीय पारितोषिक बारस्कर ईश्वरी सतीश (नगर परिषद प्रशाला) (उपप्राचार्य प्रा.आप्पासाहेब मिटकरी यांच्या तर्फे तीन हजार) यांनी पारितोषिक पटकावले. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्यांना पाच पारितोषिक अनुक्रमे उत्तेजनार्थ रुपये एक हजार एक देण्यात आले,यांमध्ये मोरे गौरी दीपक (लालबहादूर शास्त्री विद्यालय,खेड ता.धाराशिव) आडसूळ विरेन गणपती (हनुमान विद्यालय, घारगाव), शिंदे श्रद्धा दादासाहेब(सावित्रीबाई फुले विद्यालय), मोरे सुषमा अण्णासाहेब (जि.प.प्रशाला वडगाव-सिद्धेश्वर), खडके तन्वी अशोक (छत्रपती हायस्कूल, धाराशिव ) स्पर्धेचे शालेय गट विषय आई माझा गुरु आई कल्पतरू, मोबाईल शाप की वरदान, खरच आज स्त्री पुरुष समानता आहे, तर महाविद्यालय गट विषय संविधानाची ७५ वर्ष आणि आपण,खंबीर पुरुषामागे स्त्रीचा हात असतो आणि आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा आधारस्तंभ विषय ठेवण्यात आले होते. परीक्षक म्हणून शालेय गटाचे सोपान पवार (विद्याभवन हायस्कूल),विष्णुदास चेवले (जनजागृती विद्यालय), प्राचार्य हनुमंत सौदागर (भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज), महाविद्यालय गटास प्रा.डॉ.हनुमंत माने (छत्रपती शिवाजी महाविद्यालय), प्रा.महादेव गपाट (स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, देवधानोरा ) बंडू काळे (विद्याभवन हायस्कूल) यांनी काम पाहिले. प्रा.डॉ.ए.आर.मुखेडकर,प्रा.डॉ. मीनाक्षी जाधव, प्रा.डॉ.डी.एन.चिंते, प्रा.डॉ.डी.एस.साकोळे, प्रा.डॉ. पल्लवी उंदरे, प्रा.डॉ.आर.व्ही.ताटीपामूल, प्रा.किरण बारकुल,प्रा.सूरज पाटील,प्रा.मारुती शिंपले यांनी संयोजन समितीत काम पाहिले. उद्धाटन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे आभार सांस्कृतिक विभागप्रमुख आणि मुख्य संयोजक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले, पारितोषिक वाचन प्रा. डॉ.दादाराव गुंडरे यांनी मानले. स्पर्धेसाठी अधीक्षक हनुमंत शिंदे, इक्बाल शेख,अरविंद शिंदे आणि संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले