August 8, 2025

साक्षी पावनज्योतच्या कै.सुमन (आई) मोहेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन विशेष अंकाचे प्रकाशन संपन्न

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योतचा कै.सुमन (आई) मोहेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्राचार्य डॉ.हरिदास फेरे व ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले
    हा कार्यक्रम दि.२५ जानेवारी २०२५ रोजी कै.सुमन (आई) मोहेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आयोजित वकृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या सुरूवातीला संपन्न झाला.
    याप्रसंगी प्राचार्य डॉ.सुनिल पवार,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव आडसूळ महाराज,ज्येष्ठ समाजसेवक सुफी शमशोद्दीन सय्यद,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य अप्पाराव मिटकरी, मोहा गावच्या सरपंच सौ.सिमा मडके,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत,उपसंपादक अरविंद शिंदे,प्रा.डॉ.दिपक सुर्यवंशी,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
    या विशेष अंकात कै.सुमन (आई) मोहेकर यांच्या जीवनकार्याचा आढावा,त्यांचे योगदान,आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या लेखांचा समावेश आहे.या अंकाद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
    प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सुमनताईंनी दिलेल्या प्रेरणादायी विचारांची महत्त्वाची बाजू अधोरेखित केली.त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करताना,त्यांच्या शिकवणींवर चालण्याचा निर्धार केला गेला.
error: Content is protected !!