धाराशिव – महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रसार व प्रचार ग्रामीण भागात पोहोचविण्याच्या उद्देशाने तगरभूमी बुद्ध फिलॉसॉफी रिसर्च ट्रेनिंग अँड सोसायटी धाराशिव यांच्या वतीने रविवारी दि. १९ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव येथे बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो असतील.प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव यशवंतराव आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. पु.भंते सुमेधजी नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद होत आहे. कार्यक्रमस्थळी बुद्धगया येथील बोधि वृक्षाचे रोपण तसेच २८ फूट उंचीचा अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा भीमराव आंबेडकर यांचे हस्ते होणार आहे. या परिषदेचे स्वागताध्यक्ष कैलास शिंदे,संयोजक पी.एम. सोनटक्के,निमंत्रक म्हणून चेतन शिंदे आहेत.यावेळी कार्यक्रमात भिमशाहीर साहेबराव येरेकर यांचा बुद्ध व भीम गीताचा कार्यक्रम सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील सर्व बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,पदाधिकारी तसेच बौद्ध बौद्धाचार्य,समता सैनिक दल यांची उपस्थिती राहणार आहे.परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला