डिकसळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे डिकसळ येथे दि.१६ जानेवारी २०२५ रोजी सात दिवसाच्या शिबिराच्या उद्घाटन झाले. यावेळी शिबिराचे उद्घाटक ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले, “शिक्षण आणि श्रमदान यांची जोड दिली पाहिजे.श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.याच जाणीवेतून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते.यावर्षीची संकल्पना देशासाठी युवक आणि डिजिटल भारत अशी असून डिजिटल साक्षरता होणे काळाची गरज आहे. ग्रामस्वच्छता,आरोग्य तपासणी,अंधश्रद्धा निर्मुलन, पर्यावरण संवर्धन अशा गोष्टीची जाणीव ठेवावी.महाविद्यालयीन तरुणांनी समाजसेवेतून राष्ट्रविकासात भूमिका महत्वाची आहे.” सुरुवातीला संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आणि स्वच्छता हीच सेवा असा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ. संजय कांबळे (संचालक तथा अधिसभा सदस्य ) यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील पवार तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, डॉ.के.डी. जाधव हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताचिक आणि शिबिरातील नियोजन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. आर.व्ही.ताटीपामूल, सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.पल्लवी उंदरे यांनी तर आभार प्रा.डॉ.के.डब्लू.पावडे यांनी मानले. या राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिराचे नियोजन कार्यक्रमाधिकारी संदीप महाजन यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी,प्रा.दिपक सूर्यवंशी,प्रा.दादाराव गुंडरे, प्रा.डॉ.अर्चना मुखेडकर, प्रा.डॉ. मीनाक्षी जाधव, प्रा.डॉ. विश्वजीत मस्के, प्रा.डॉ. समाधान चंदनशिव,प्रा.डॉ.बालाजी वाघमारे, प्रा.डॉ.नागनाथ आदाटे, प्रा.डॉ.ज्ञानेश चिंते, प्रा.भिसे ,प्रा. सुरज पाटील, प्रा. वाकडे सर, ग्रंथपाल अनिल फाटक, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे, डिकसळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी अधिक्षक हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर,संदीप सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले