August 9, 2025

निराधारचे पेन्शन दरमहा वाटप करा — रामभाऊ लगाडे

  • कळंब –
    वाशी तहसील कार्यालयावर जाणीव संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ जानेवारी २०२५ रोजी आक्रोश मोर्चाचे करण्यात आले होते. या मोर्चामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे पेन्शन परिपत्रका प्रमाणे दरमहा वाटप करा,सन २००३ पासून केंद्र शासनाचे दोनशे रुपये हिस्सा प्रमाणे सर्व लाभधारकांना समान पेन्शन वाटप करा,एकल महिला, विधवा, परितक्त्या, गरीब निराश्रीत लाभार्थ्यांना रु (२१०००)वार्षिक उत्पन्न अट रद्द करण्यात येऊन त्यात (५१०००)रुपये वाढ करून नागरीकांना योजनेचा लाभ देण्यात यावा, विभक्त कुटुंबांना शिधापत्रिका देऊन त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे, गावोगावी मागासवर्गीय पारधी अल्पसंख्यांक यांना स्मशानभूमी करीता जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्या ठीकाणी स्मशान भुमी उपलब्ध आहे त्या ठिकाणच्या स्मशानभूमीची नोंद करून त्या ताब्यात देण्यात याव्या, वाशी तालुक्यातील गायरान जमीनीवर अतिक्रमण केलेल्या शेतकर्यांना सातबारा द्या, दलित आदिवासींना समाज बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवा. अशा आशयाच्या मागण्या या वेळी मार्चात करण्यात आल्या.सदरील मोर्चाची सुरुवात पारा चौकातून करण्यात येऊन शिवाजी नगर मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला. तसेच संघटनेच्या वतीने तहसीलचे नायब तहसीलदार शिंदे यांना जे.जे. तवले,जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, शेषराव गाडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तर मोर्चाच्या ठिकाणी स्व. संतोष देशमुख व स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मार्चला मधुकर गायकवाड, भीमराव पवार, रत्नदीप गाडे, नवनाथ शिंदे, भागवत काळे, दिलीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मोर्चामध्ये अब्दुल तांबोळी, शहानुर पठाण, किरण लगाडे, पंढरी मुळे, सुनील बनसोडे, रावसाहेब गायकवाड, रामलिंग घुले, विनोद शिंगारे,भिकाजी गरड, यांच्या सह वाशी तालुक्यातील दोनशे ते अडीचशे लोक मार्चात सहभागी झाले होते.
error: Content is protected !!