कळंब – शहरातील आंबेडकरी चळवळीतील नागरिकांच्या वतीने दि.१४ जानेवारी २०२४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच शहीद भीम सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ही परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पणाने करण्यात आली.यानंतर सामुदायीक त्रिशरण पंचशील घेवून शहीद भीम सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या बलिदानाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक न्याय,शिक्षण आणि समतेसाठी दिलेल्या योगदानावर चर्चा केली. या लढयात शहीद भीम सैनिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला सुनील गायकवाड, सतपाल बनसोडे,बी.एन.शिलवंत,सी.आर.घाडगे,विठ्ठल समुर्दे,राजाभाऊ गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,शिवाजी सिरसट,बंडू बनसोडे,प्रा.अविनाश घोडके,सूर्यकांत ढवळे,प्रमोद ताटे,माणिक गायकवाड,चरणसिंह गायकवाड,बापू गायकवाड, सचिन तिरकर व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील नागरिक,विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त प्रतिमेस उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.दत्ता साकोळे,प्रा.नितीन अंकुशराव, संतोष मोरे सह आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
उत्तर भिम नगर शिराढोण ता.कळंब येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. नामांतराच्या लढ्यात योगदान दिलेल्या भिम सैनिक व गावातील ज्यांनी नामांतर लढ्यातील पॅंथर ला साथ दिली अश्या पुरोगामी विचारांच्या नागरिकांचा सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देवुन गौरवण्यात आले. प्रकाश नाईकवाडे,गोरोबा नाईकवाडे,कल्याण नाईकवाडे,जीवन नाईकवाडे, संभाजी नाईकवाडे,राजाभाऊ सोनवणे,प्रताप नाईकवाडे, आनंद नाईकवाडे,व इतर बुध्द वासी झालेले गौतम नाईकवाडे, सुरेश सरवदे,प्रकाश गोरे,पोमा सिरसाट, विजय गोरे, यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत राहुल हौसलमल, सरपंच लक्ष्मी ताई म्हेत्रे, बाळासाहेब माकोडे,नासेर पठाण,नितिनआबा पाटील,अँड. नितीन पाटील,किरण दादा पाटील,वरुन पाटील,पञकार रणजित गवळी, पत्रकार अमोल चंदेल, झेलम शिंपले, ताजखॉ पठाण, आदुंबर कैलास पाटील, राजेश पाटील, ग्रा. पं सदस्य बेबीनंदा गोरे,ज्योती नाईकवाडे., आंजली गायकवाड,कोमल नाईकवाडे ईत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम संघर्ष मित्र मंडळ यांनी कार्यक्रम आयोजित केला.
कळंब तालुक्यातील रांजणीच्या साई संगणक शास्त्र महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . “विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य जे.सी.गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. ए.डी.जाधव,एम.के.साबळे ,प्रा.एन.एम. चाऊस ,प्राध्यापिका पी.बी.मोरे ,एम.आय.शिंदे,डी. एल.शेळके ,बी.डी.लांडगे आदी उपस्थित होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार दिन विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. विद्यापीठ गीत श्रवण करण्यात आले. डाॅ.दिगंबर नेटके,निवृत्त संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित कार्यक्रमास अध्यक्षस्थान भूषविले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डाॅ. विक्रम शिंदे इ. व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, देविदास पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याची महती सर्वाना विदित व्हावी. आपणही प्रेरणा घेऊन महत्वपूर्ण कार्य करावे. हक्कांबाबत जसे जागरूक आहोत, त्याचबरोबर कर्तव्याबाबतही जागरूक असणे आवश्यक आहे. महामानवाने पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वानी योगदान देण्यासाठी कटिबद्ध असावे. विकसित भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वानी कर्तव्य बुद्धीने कार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले. प्रमुख अतिथी डाॅ. दिगंबर नेटके, निवृत्त संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी विशेष व्याख्यानातून मार्गदर्शन केले. विद्यापीठाला नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागला. दलितांसह इतर सर्व समाज घटकांच्या विकासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार सर्वांना दिला. चिंतन, मनन, संशोधन कार्यातून रंगले, गांजलेले सर्वांच्या विकासासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले. नव्या एकात्म भारताचे स्वप्न पाहिले. नामांतर लढा व हैद्राबाद संस्थान मुक्त करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सत्तेच्या आडुन शोषण करणाऱ्यावर प्रहार केले. अस्पृश्य जातीही इतरांप्रमाणेच या मातृभूमीची लेकरे आहेत. हिंदुस्थान हे आपले घर आहे, हे अस्पृश्यानी विसरु नये. शेड्युलड कास्ट फेडरेशनचे हैद्राबाद मुक्ती लढ्यात सहभाग घेतला. सैन्याचा उपयोग मुक्ती लढ्यासाठी करावा व पोलीस ॲकशन म्हणावे, अशी भुमिका डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडून वल्लभ पटेल यांना महत्वपूर्ण सहकार्य केले. पंडित जवाहरलाल नेहरु, सरकार वल्लभभाई पटेल आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. कोणतीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाली नाही. पोलिस ॲकशन, ॲकशन पोलो असे नाव देण्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय मुत्सद्दीपणा दिसुन येतो. लष्करी कार्यवाही आंतरराष्ट्रीय मुद्दा ठरतो, पोलिस ॲकशन देशांतर्गत कार्यवाही ठरेल. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था प्रश्न मुत्सद्देगिरीने सोडविण्यात आला. शैक्षणिक, आर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक मागासलेपण दुर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाड्यात स्वतंत्र विद्यापीठ असावे, असे मत सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय स्थापनवेेळी मांडले. सर्व जाती धर्मातील शैक्षणिक मागासलेपण दुर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाड्यातील शिक्षण संदर्भातील प्रणेते होते. पुरोगामी विचारसरणीत मराठवाड्यातील सर्व लोकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याचा आग्रह धरला. शिक्षण हे उत्कर्ष होण्यासाठी महत्वपूर्ण आहे. अन्यथा जीवन असुरक्षित व कठिण बनते, असे त्यांचे मत होते. आर्थिक विचार आणि सामान्य माणूस यांमधील संबंध त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विद्यापीठ उपपरिसराचे संचालक, प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31 वा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मराठवाडा विभाग, हैद्राबाद संस्थान मधुन मुक्त करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन करुन उच्च शिक्षणाची सुविधा मराठवाड्यात उपलब्ध करुन दिली. पुरोगामी लोकांनी नामांतरच्या भूमिकेला समर्थन दिले. विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डाॅ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डाॅ. जितेंद्र शिंदे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले