August 8, 2025

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम;लाभ घेण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका)- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना आहे.या योजने‌द्वारे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येते.उत्पादन उ‌द्योगासाठी ५० लाख व सेवा उ‌द्योगासाठी २० लाखापर्यंत कर्जमर्यादा आहे.
    या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी १५ टक्के ते २५ टक्केपर्यंत व महिलांसाठी २५ टक्के ते ३५ टक्केपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हा उ‌द्योग केंद्रास ८०० कर्ज प्रस्तावांचे उ‌द्दिष्ट प्राप्त झाले आहे.
    तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उ‌द्योग केंद्र धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उ‌द्योग केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!