August 8, 2025

सार्वजनिक ग्रंथालयांनी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

  • धाराशिव(जिमाका) – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी आणि असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात.
    सन २०२३-२४ सांठी विविध समान आणि असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा. समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहे.( Matching Schemes) १) इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना २५ लाख रुपये. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी रु.४ लाख व इमारत बांधकाम रु. १० ते १५ लाख), राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (रु. २.५० लाख) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (रु. २ लाख), महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य – (६.२० लाख / व इमारत विस्तार रु.१० लाख), राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु. १.५० लाख, रु. २.५० लाख, रु. ३.० लाख), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय “बाल कोपरा स्थापन” करण्याकरीता अर्थसहाय्य (रु. ६.८० लाख )
    योजनेसाठी करावयाचा अर्ज : या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबर-२०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.
error: Content is protected !!