August 8, 2025

नरसिंग खिचडे,संदीप कोकाटे, शाम जाधवर आदर्श दर्पण पुरस्कार प्रदान

  • कळंब – पत्रकार दिनाच्या निमित्ताने सेवा पुरस्कार समिती कळंब च्या वतीने पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य विषयक , क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व लेखन करणाऱ्या पत्रकारांचा आदर्श दर्पण पुरस्कार देऊन गौरव केला जातो.यावर्षी 1० जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर बालक आश्रम कळंब येथे सामाजिक कार्यकर्ते सुफी समशोद्दीन सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात व प्रमुख पाहुणे असोसिएट एडिटर एनडी टीव्हीमराठी मुंबई,एनडीटीव्ही मराठी मुंबई डॉ.कविता राणे, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभय देशपांडे,मुंबई, माध्यम व जनसंपर्कतज्ञ मुंबई सचिन साळुंखे यांना,धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांच्या हस्ते पत्रकार दिनाच्या निमित्ताने जाहीर केलेले पुरस्कार
  • उत्कृष्ट लेखन व वृत्तांकन याबद्दल नरसिंग धोंडीराम खिचडे, ( संपादक साप्ताहिक तेरणा एक्सप्रेस ),संदीप अशोक कोकाटे, ( संपादक साप्ताहिक नमस्ते धाराशिव व ई पेपर ,सोशल मीडिया वृत्तवाहिनी ),शाम बाबुराव जाधवर ( कळंब तालुका प्रतिनिधी दैनिक आरंभ मराठी ) यांचा सन्मानपत्र,शाल,पुष्पहार देऊन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवंत पांडुरंग,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथराज भगवत गीता,ज्ञानेश्वरी, गाथा या ग्रंथाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.कार्यक्रमात
    महादेव महाराज अडसूळ व कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सेवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,सरस्वती अडसूळ यांनी केला तर सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी व आभार अच्युतराव माने यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे,रमेश बोर्डेकर,विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे,बब्रुवान पांचाळ,उद्योजक विठ्ठल माने,महादेव खराटे, अनिल यादव,शिवाजी गीते,महिला कार्यकर्त्या धनश्री कवडे,स्नेहा टोणगे,कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे,प्राचार्य जगदीश गवळी,बालाजी अडसूळ, परमेश्वर पालकर,सतीश मातने , संभाजी गिड्डे,सुभाष घोडके, सचिन क्षीरसागर यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!