August 9, 2025

आनंद मेळाव्यातून भविष्याचे सक्षम नागरिक तयार होणार – विठ्ठल माने

  • जनजागृती प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
  • कळंब – प्राथमिक शाळांमधून बाल आनंद मेळावा हा उपक्रम राबविला जात असुन या मधून विद्यार्थ्यांचे व्यवहारीक ज्ञान वृद्धिंगत होत असुन त्यामुळे भविष्यात देशाची ही भावी पिढी सक्षम नागरिक तयार होतील असा आशावाद उद्योजक विठ्ठल माने यांनी व्यक्त केला ते शहरातील जनजागृती प्राथमिक विद्यालयातील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
    कार्यक्रमाची सुरुवात फित कापून व देवी सरस्वतीचे पुजन करून करण्यात आली.यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,विस्तार अधिकारी सुशील फुलारी,मुख्याध्यापक अश्रुबा माने,भागवत चौधरी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गौतम सिरसाट उपस्थित होते.
    पुढे बोलताना माने म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारीक ज्ञान व अनुभवातील शिक्षण सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो व हे ज्ञान भविष्यात तो जिवन जगताना त्याला उपयोगी पडते.त्यामुळे शैक्षणिक सहल,उद्योगांना भेटी असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
    या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला,विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक भागवत चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र चंदनशिव,रफिक शेख,दिपा सिससट,घोडके मॅडम यांनी परिश्रम घेतले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!