August 9, 2025

सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर प्रती कृतज्ञता

  • कळंब शहरातील समता नगर,पुर्नवसन सावरगाव येथील धरणग्रस्त हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत घेतलेले शिक्षणच माझ्या जीवनाचा पाया ठरले.कारण की,सध्या मी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने सरांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालयात इंग्रजी विषय छात्राध्यापक व छात्राध्यापिकांना अध्यापन करण्याचे काम करत आहे. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत दि.६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व छात्राध्यापकांना आतंरवासिता सराव पाठासाठी घेऊन जाताना एक वेगळाच आनंद अनुभवत होतो.हीच खरी माझ्या यशस्वीतेची अनुभूती आहे.

  • माझा प्रवास प्राथमिक शिक्षणापासून सुरू होऊन प्राध्यापकपदापर्यंत पोहोचला आहे.शिक्षक म्हणून माझ्या मनात बालपणीच्या शाळेच्या आठवणींनी कायम स्थान मिळवले आहे.शिक्षण क्षेत्रात मी घेतलेल्या मेहनतीचे आणि मिळवलेल्या यशाचे श्रेय माझ्या गुरूंना,विद्यार्थ्यांशी असलेल्या नात्याला आणि माझ्या शाळेच्या संस्कारांना देतो.

  • आजच्या पिढीतील शिक्षणार्थींनी शिक्षणातील मूल्ये आत्मसात करून त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा,असा संदेश मिळाला.विद्यार्थ्यांसोबत सराव पाठ घेताना मला त्या काळातील आठवणींनी नवचैतन्य लाभले आहे.अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवी पिढी अधिक सक्षम आणि कर्तृत्ववान होईल,यात शंका नाही.

  • या सर्वांच्या प्रती “कृतज्ञता” व्यक्त करण्यासाठी सराव पाठाच्या शेवटच्या दिवशी सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरातील माझे शिक्षक मा.आमरोद्दीन शेख सर,श्रीमती सुरेखा नाईकनवरे मॅडम,श्रीमती सुहागिनी लोंढे मॅडम,श्रीमती ज्योती पवार मॅडम,हरिदास बाराते सर व श्रीकांत कवडे सर यांचा शाल,पुष्पगुच्छ व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित “विरंगुळा” हे अग्रलेख व पथनाट्यांचा संग्रह असलेले पुस्तक भेट देवून यथोचित सन्मान केला.
    याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील माझे ज्येष्ठ सहकारी मराठी विषय प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे व छात्राध्यापक-छात्राध्यापिकांची उपस्थिती होती.
  • — प्रा.अविनाश रंजना सुभाष घोडके
    भैरवनाथ अध्यापक विद्यालय, कळंब
error: Content is protected !!