धाराशिव (जिमाका) – हयातीचे दाखले सादर करण्याचे निवृत्तीवेतन धारकांना दाखला जिल्हा कोषागार कार्यालय, याअंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. यादीत आधारकार्ड,पॅनकार्ड, मोबाईल नंबर,पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती देखील नोंदवावी. या पध्दतीशिवाय बायोमॅट्रीक पध्दतीने जीवन प्रमाण www.jeevanpramaan.gov.in या संकेत स्थळावर 1 नोव्हेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023 कालवधीत सादर करावे. तसेच हयातीचे दाखले प्रत्यक्ष निवृत्तीवेतन धारकाकडून प्रत्यक्ष व टपालामार्फत सादर करता येतील. यादीत ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलॉईन जीवनप्रमाण दाखला सादर केला नसेल, प्रत्यक्षरित्या अथवा टपालाद्वारे हयातीचा दाखला कोषागारामध्ये सादर केला नसेल, त्यांचे माहे डिसेंबर 2023 पासूनचे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. ज्या कुटूंब निवृत्तीवेतनधारकाना ८० वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांना मूळ वेतनामध्ये १० टक्के निवृत्तीवेतन वाढ करुन यासाठी त्यांचा जन्म तारखेचा पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड जिल्हा शल्य चिकित्सकाचे वयाचे प्रमाणपत्र) कार्यालयास सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गोपाळ निगवेकर यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला