August 8, 2025

उद्योगविषयी एक दिवसीय कार्यशाळा

  • धाराशिव(जिमाका) – महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून, रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी, उदयोगाच्या विकासासाठी राज्य, तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग, त्यांचे उपक्रम आणि योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत.
    या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच वेळी उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने धाराशिव येथे 4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे याच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
    एक दिवसीय कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी सहकारी संस्था आणि उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे, तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक व बँका यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यशाळा 4 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन धाराशिव येथे सकाळी 9.30 वाजता होणार आहे.इच्छुकांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!