गौर – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत गौर येथे दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी पहाटे तालुकास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने अचानक भेट दिली. उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांना समज दिली. तसेच शौचालय वापर न करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई व दंड आकारण्यात येईल याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. यावेळी पथकप्रमुख विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंके,ग्रा.पं.अधिकारी मंगेश जावळे व ग्रा.प. कर्मचारी यांनी सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले