August 9, 2025

वाचनसंकल्प महाराष्ट्राचा निमित्ताने डॉ.राममनोहर वाचनालयाचे सामूहिक वाचन

  • करंजकल्ला – वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या नववर्ष उपक्रमा अंतर्गत वाचनसंस्कृती वाढीसाठी चालना म्हणून डॉ.राममनोहर वाचनालय करंजकल्ला ता. कळंब जि.धाराशिवच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजकल्ला येथे दि ६ व ७ जानेवारी रोजी सामूहिक वाचन घेण्यात आले.वाचन हे यशस्वी होण्यासाठी व ज्ञान मिळवण्यासाठी जीवनात अत्यंत गरजेचे आहे तसेच वाचनातून आपणास इतिहास,भूगोल तसेच सामान्य ज्ञान याची भर पडतेच पण इतरही अभ्यासपूरक ज्ञानाची जोड मिळते.वाचनामुळे अभ्यासाची गोडी निर्माण होते.वाचनातून मिळणारे ज्ञान हे निरंतर शिक्षणाचा एक भाग आहे असे वाचनालय कार्यवाह संतोष पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.
    यावेळी मराठवाडा मुक्ती लढ्याचा इतिहास एक समीक्षा या पुस्तकाचे वाचन घेण्यात आले.पुस्तक वाचन हे क्रमशः घेण्याचे सुचवण्यात आले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज दिवाने,अखिल कुलकर्णी,ढेपे,कसबे,आंधळे,
    श्रीमती कुलकर्णी,श्रीमती चाटे , वाचक सुंदर पवार ,नितीन पवार वाचनालय कर्मचारी कैलास पवार यासह शालेय विदयार्थी –विदयार्थीनी उपस्थित होते.
error: Content is protected !!