उमरगा – समाजातील युवतीनी सबला बनल्याशिवाय समता येणार नाही असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी व्यक्त केले. समाज विकास संस्थेच्या वतीने सावित्रीमाता फुले यांच्या जयंतीनिमित्त जनरल ड्युटी असिस्टंट कोर्सच्या विद्यार्थ्यांसमोर त्या बोलत होत्या. अनुसया माने यांच्या शुभ हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार म्हणून अर्पण करून जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला समाज विकास संस्थेचे सेक्रेटरी भूमिपुत्र वाघ,आणिक फायनान्शिअल सर्विसेस सी.ई.ओ निखिल वाघ, शिक्षक आफ्रिन मुल्ला,अजित कांकरिया इत्यादी कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पीएसआय अनुसया माने या बोलत असताना म्हणाल्या की,स्त्री अत्याचार रोखण्यासाठी पहिल्यांदा महिलांनी सबल व्हावं लागेल. ऐकावं लागेल.मोठ होऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे त्याशिवाय या समाजातील हिंसा थांबणार नाही. कुठे अडचणी आल्यास पोलिसांच्या मदतीसाठी 112 नंबर लावून आपण आपले संरक्षण करू शकता.त्यासाठी पहिल्यांदा सबला बननें अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन पीएसआय अनुसया माने यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भूमिपुत्र वाघ बोलत असताना डॉ. यशवंतराव फुले आणि माता सावित्रीने प्लेगाच्या साथी मध्ये केलेलं कार्य आपल्या जीवनाचं केलेलं समर्पण पण या विषयावरती सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आफ्रिन मुल्ला यांनी केले.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा