August 10, 2025

विद्याभवन शाळेतील 1997 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब मधील इयत्ता दहावी 1997 बॅचमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा दिनांक 5 जानेवारी रोजी मुंडे शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना
    निमंत्रित केले होते.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभवन हायस्कूलचे 1997 बॅचचे शिक्षक टी.जे. चौधरी हे होते तर मंचावर उपस्थित शिक्षक वृंद डी.एस. मोराळे,भागवतराव गव्हाणे, सुधाकर चेचे,कौशल्या मोराळे, उर्मिला देशमुख,विमल जाधवर , सुचित्रा खंडागळे,तीर्थकर मॅडम, एस.सी.डोरले यांची उपस्थिती होती.उपस्थित शिक्षक वृंदांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर गेट-टुगेदर कार्यक्रमाचे संयोजक सचिन कटारे,कमरूनिसा खान, सागर मुंडे यांनी शिक्षक वृंदांचा शाल,श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला व त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला सत्कारला उत्तर देताना विद्याभवन प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून राहिलेले भागवतराव गव्हाणे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिकवीत असतानाचे अनुभव तसेच मुख्याध्यापक म्हणून प्रशासनातील अनुभव सांगितले शाळेतून मिळालेले ज्ञान व शिस्तीचे धडे पुढील जीवनासाठी शिदोरी असते असे सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षका बरोबर विद्यार्थी व पालक त्यांची भूमिका महत्वपूर्ण असते असे विचार व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात टी.जे. चौधरी यांनी या बॅचच्या आठवणी सांगितल्या व माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना स्नेह मेळाव्यासाठी एकत्रित बोलाविले आहे बद्दल आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात जाऊन रनिंग करीत शारीरिक तंदुरुस्त असल्याचा संदेश दिला व एका वर्गातील आठवणीला उजळा ही मिळाला तर कार्यक्रमाच्या ठिकाणी संगीत खुर्ची , प्रश्नमंजुषा,दोन मिनिटात पायात सॉक्स आदी खेळ व स्नेहभजल्यानंतर स्नेह मेळाव्याची सांगता झाली 38 वर्षानंतर हे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित भेटले होते याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 1997 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केल्याबद्दल ग्रुप ॲडमिन दुर्गा वाघमारे – शिंदे यांचा उपस्थित वर्ग मित्रांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा गव्हाणे व प्रसाद देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कटारे, कमरु निसा खान,सागर मुंडे, डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. अमित पाटील ,ऑडिटर शिराज बद्रुद्दीन शेख, शरीफ तांबोळी, दर्शन ढोकीकर, गणेश डोंगरे, नितीन गायकवाड ,प्रताप शिंदे ,ज्वाला हौसलमल , बालाजी स्वामी, प्रजाता ईनामदार ,सारिका हरदास ,शीला कुलकर्णी,कुंदा शेटे ,सुषमा भागवत,रेखा त्र्यंबके,रेखा दौंड, अश्विनी पतंगे ,यशवंत माने ,शततारका कोकाटे, शुभांगी पत्की ,वंदना लोंढे, सीमा पंडित, अनिता तावरे, रेश्मा मिर्झा, सुषमा भागवत यांचा समावेश होता.
error: Content is protected !!