February 9, 2026

श्रावस्ती बुद्ध विहारात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी

  • लातूर – श्रावस्ती बुद्ध विहारात दि.३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती कृतीशील विचाराने आरोग्य शिबीर घेऊन साजरी केली.
    यावेळी अध्यक्षपदी पुष्पा शिंदे तर प्रमुख पाहूणे म्हणून रागिणी यादव,नगरसेविका,मनपा लातूर,डॉ. सुनीता कदम,डॉ.बोंडगे होत्या.
    प्रथम तथागत गौतम बुध्द,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला धूप,दीप,पुष्पहार घालून वंदन केले.
    मग पाहुण्यांचा पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.यावेळी बुध्द विहाराच्या श्रद्धावान उपासिका ज्योती घारगावकर यांचा वाढ दिवस नगरसेविका रागिणी यादव यांनी साडीचोळी,शाल,पुष्पहार देऊन तर आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी साडीचोळीसाठी बंद पॉकेट भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर रागिनी यादव यांनी बुध्द विहाराच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी प्राप्त होईल असे सांगत लातूर शहरात क्रांतिज्योती सावित्रीमाईचा पुतळा नक्की उभारणार असा संकल्प बोलून सर्वांना शुभेच्छा दिल्या.यानंतर सर्वरोग निदान शिबीर घेऊन सांगता केली.यावेळी मंगल धायगुडे,विजयमाला सरवदे,कविता श्रंगारे,वर्षा ढगे, जाणते सिस्टर,ज्योती काळे,राजश्री स्वामी,रत्नमाला माने,मनीषा गायकवाड,सीता काळे,ज्योती घारगावकर आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!