February 9, 2026

१३ ते २२ जानेवारी दरम्यान हजरत ख्वाजा शमशोद्दीन उर्स

  • धाराशिव (जिमाका) – हिंदू – मुस्लिम भाविकांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.१३ ते २२ जानेवारी दरम्यान उर्सचे आयोजन करण्यात येणार आहे.ऊर्सची ही परंपरा ७२० वर्षापासून सुरू आहे.या ऊर्समध्ये दरवर्षी संदल मिरवणूक,कव्वाली,मुशायरा, शबे गजल,महफिल-ए-समा व वाजबयान इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावर्षी देखील १३ जानेवारीपासून उर्सला सुरुवात होत आहे.
    १३ जानेवारीला सायंकाळी ७ ते रात्री ९ – पंखा मिरवणूक,१४ जानेवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ -सेहरा मिरवणूक,१५ जानेवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ – गुसल पाणी मिरवणूक,१६ जानेवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत – मुख्य संदल मिरवणूक व महेफील – ए -समा,१७ जानेवारी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत – चिरागा कार्यक्रम व कव्वाली कार्यक्रम, महफिल – ए – समा,१८ जानेवारी सकाळी १० वाजता दर्गा येथे – जिरायत कार्यक्रम व रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत – कवाली कार्यक्रम,१९ जानेवारी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत – वाजबयान व नाते शरीफ कार्यक्रम, २० जानेवारी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत – मुशायरा कार्यक्रम,२१ जानेवारी रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत – गझल कार्यक्रम आणि २२ जानेवारी दुपारी ३ वाजता – कुस्ती स्पर्धा आणि रात्री ९:३० वाजता – आतिषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • हे सर्व कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत साजरे केले जाणार आहे.दर्गा हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांचा वार्षिक उर्सचे चांगल्याप्रकारे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन काम करीत आहे. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर या तयारीच्या दृष्टीने जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत.
error: Content is protected !!