August 10, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांना विविध ठिकाणी अभिवादन

  • कळंब – “नाचू कीर्तनाच्या रंगी,ज्ञानदीप लावू जगी”हे संत नामदेवाचे वचन घेवून ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून मराठवाड्यात विविध ठिकाणी शाळा,विद्यालय,वरिष्ठ महाविद्यालये स्थापन करून शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणारे ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना दि.२ जानेवारी २०२५ वार गुरुवार रोजी मराठवाड्यात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
  • शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब
    कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुतळ्यास उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनील पवार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
  • ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी ज्येष्ठ संचालक शहाजी पाटील,प्राचार्य संजय जगताप, प्रा.करंजकर,प्रा.दिग्विजय पाटील आदींची उपस्थिती होती.

  • विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

  • विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे नवनियुक्त मुख्याध्यापक व्यकंट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षक श्रीमती कोळी जे.एन यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली.
    याप्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता.भूम येथे माजी मुख्याध्यापक यादव बी.पी यांच्या हस्ते शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके व सर्व शिक्षक,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

  • ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,श्रीमती पांचाळ उषा , श्रीमती पाटील स्मिता,पांडुरंग जाधव आदींची उपस्थिती होती.
  • ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
  • जय भवानी विद्यालय पारा या प्रशालेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक बारीकराव शेळके,प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी एन.बी ,भराटे एस.डी, श्रीमती मेटे एस.व्ही,वाघमारे एस.झेड,मुरकुटे डी.व्ही,माळी व्ही.एस,बांगर ए.बी,मुळे डी. एस ,अमोल गवळी,तुषार डंबरे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
  • विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील पांचाळ व सर्व शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी) येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी शिक्षक विद्यार्थी व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!