कळंब – वाढदिवसानिमित्त होणारा अपव्यय खर्च टाळून लोकनेते अजित पिंगळे यांच्या संकल्पनेतून मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या परिवाराला अर्थिक मदतीचा हातभार लाभावा यासाठी ‘अर्थिक मदत’ जमा करण्यासाठी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी सामाजिक सलोखा जपणाऱ्या दयावान प्रतिष्ठान कळंबच्या वतीने २७,७८६/- रूपयांची मदत रक्कम जमा करण्यात आली.या वेळी,या नेककार्याची संकल्पना राबविणारे शिवसेना नेते अजित पिंगळे,अरूण चौधरी,गुणवंत पवार,बापू जाधव यांच्या सह दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला,अभय गायकवाड,समीर सय्यद,गणेश त्रिवेदी,डिकसळ ग्रा.पं.सदस्य मुबीन मनियार,जीवा कुचेकर, सम्राट गायकवाड,रणजित चंदनशिवे,अमर मुल्ला,विशाल ठोंबरे,इम्रान काझी,शफीक शेख यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन