कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथील मुख्याध्यापक विलास सोपानराव पवार प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार कळंब येथे नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर तर प्रमुख अतिथी म्हणून अंकुश बप्पा पाटील कोषाध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश काका टेकाळे,ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे प्रशासकीय अधिकारी रमेशराव मोहेकर,विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते मुख्याध्यापक विलास पवार यांचा सपत्नीक पूर्ण आहेर देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,सोपान पवार,प्रियंका पवार, श्वेता पवार,तीर्थकर एस.एस आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सुरेश काका टेकाळे,डॉ.अशोक दादा मोहेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विद्याभवन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक कुंभार व्ही.जी,पर्यवेक्षक मयाचारी विक्रम,ज्ञान प्रसार विद्यालय मोहाचे मुख्याध्यापक संजय जगताप,ज्ञान उद्योग विद्यालय येरमाळाचे मुख्याध्यापक शिवाजी पौळ, छत्रपती संभाजी विद्यालय जवळा खुर्द संभाजी गिड्डे, छत्रपती हायस्कूल लातूरचे मुख्याध्यापक दिगंबर खामकर, संभाजी विद्यालय लिंगी पिंपळगाव मुख्याध्यापक युवराज सावंत,विद्या विकास हायस्कूल आष्टाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके,काळे एस.बी,माजी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय काळे आर.एस,माजी नायब तहसीलदार सेलू काळे, काळे के.पी,काळे एस.पी कृषी संचालक छत्रपती संभाजीनगर, माजी मुख्याध्यापक नखाते राजेंद्र,शरद खंदारे, बोबडे सुंदर आदींची उपस्थिती यावेळी होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन