कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे. कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे सविसावे वर्ष असून यासाठी,एनडीटीव्ही मराठी मुंबईच्या असोसिएट एडिटर डॉ.कविता राणे,माध्यम व जनसंपर्क तज्ञ सचिन साळुंखे, प्रसिद्ध पत्रकार,लेखक धर्मराज हल्लाळे,धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे,तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक दादा मोहेकर हे उपस्थित राहणार आहेत. या दिवशी पुस्तक प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
यांचा होणार गौरव – विशाल परदेशी ( मुंबई),चंद्रकांत करडे (बार्शी),सुभाष कुलकर्णी (तेर ),मोहन तलकोकुल (सोलापूर,),सुभाष घोडके ( कळंब),शिवाजी सावंत (देव धानोरा ),अनिल क्षीरसागर (इटकुर ) यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन