धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 377 कारवाया करुन 3,09,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-बाळासाहेब वैजीनाथ कोळी, वय 31 वर्षे, रा. सातेफळ ता. केज जि. बीड हे दि.31.12.2024 रोजी 20.40 वा. सु.आपल्या ताब्यातील आयशर टॅम्पो क्र एमएच 45 – 0976 हा येरमाळा पोलीस ठाणे समोरील रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-सचिन पालाजी काळे, वय 32 वर्षे, रा.कासार सिरसी ता. निलंगा जि. लातुर हे दि.01.01.2025 रोजी 01.24 वा. सु.आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 46 बीयु 4687 ही सितारा हॉटेल समोर एनएच 65 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशोक श्रीराम ओव्हळ, वय 43 वर्षे, रा. तांबवा ता. केज जि. बीड हे दि.31.12.2024 रोजी 23.44 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 23 बीई 9457 ही गंभिरे मेडीकल समोर कळंब येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-संजित प्रतापसिंग राजपुत, वय 29 वर्षे, रा. मुदकन्ना गल्ली, मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.01.01.2025 रोजी 00.40 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 0132 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुम येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185,85(1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-सार्थक वैजीनाथ वैध्द, वय 23 वर्षे, रा.ज्ञानेश्वर मंदीर जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.31.12.2024 रोजी 23.10 वा. सु.आपल्या ताब्यातील वाहन हे बार्शी नाका धाराशिव येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 184,185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे:आरोपी नामे-विलास सुग्रीव दैन, वय 34 वर्षे, रा.शेळगाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.31.12.2024 रोजी 20.08 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 0851 ही रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-परमेश्वर सर्जेराव देवकर, वय 38 वर्षे, रा. मार्डी ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 7224 ही दि.27.12.2024 रोजी 15.00ते 16.30 वा. सु. जिदांवली मोबाईल शॉपी लोहारा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परमेश्वर देवकर यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रशांत शिवशंकर बुध्देहाळकर, वय 41 वर्षे, रा. बार्शी नाका, सुप्रिया हॉटेल जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 1140 ही दि.31.12.2024 रोजी 22.00ते दि. 01.01.2025 रोजी 07.00 वा. सु. प्रशांत बुध्देहाळकर यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत बुध्देहाळकर यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-आदित्य दिलीप राठोड, अनिकेत दिलीप राठोड,बलु शंकर राठोड, मनोज सुनिल राठोड, दिलीप रतन राठोड,ललीता दिलीप राठोड सर्व रा. काळलिंबाळा तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.31.12.2024 रोजी 19.30ते 20.00 वा. सु. समर्थ सलुन दुकानासमोर काळालिंबाळा येथे फिर्यादी नामे-बाळकृष्ण शिवाजी कंटेकुरे, वय 33 वर्षे, रा. काळालिंबाळा तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे वडील शिवाजी कंटेकुरे यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टीलचा कडा व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळकृष्ण कंटेकुरे यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2),352, 351(2)(3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-शकंर विलास कवठे, सुहास विलास कवठे,विठ्ठल महादेव दसमे व इतर एक इसम सर्व रा. नळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.31.12.2024 रोजी 21.00 वा. सु. येणेगुर येथे मरीआई मंदीरासमोर फिर्यादी नामे-चंद्रशेखर कल्याणी माळी, वय 46 वर्षे, रा. येणेगुर ता.उमरगा जि. धाराशिव यांना मोटरसायकल हाळू चालव असे बोलण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कड्यानी मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा साथीदार विकास मधुकर गाडेकर यांना चाकूने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-चंद्रशेखर माळी यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352,3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-चंद्रकांत गायकवाड, रा. मुर्टा ता. तुळजापूर जि.धाराशिव व इतर तीन इसम यांनी दि.31.12.2024 रोजी 17.00 वा. सु. मोहन गायकवाड रा.मुर्टा यांचे शेतातील पवनचक्कीचे कामावर फिर्यादी नामे-महादेव धनराज रामाने, वय 24 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना पवनचक्कीचे कामावर येण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पाच कंटेनरच्या समोरील काचावर दगड मारुन नुकसान केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव रामाने यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352,351(2), 324(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-उमेश कवरसिंग राजपूत, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांनी दि.09.08.2023 ते आज 10.00 वा पावेतो कोंड येथे फिर्यादी नामे-स्वाती सतिश राजपूत, वय 35 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव, ह.मु. नविन रेणापूर नाका, अंबेजोगाई रोड, लातुर यांचे शासनाकडून मिळालेला पिकपिमा, शेतीचे अनुदान, पी.एम. किसान योजनेचे अनुदान मिळणे करीता संमतीपत्र तलाठी सज्जा कोंड यांचे कडे देवून त्या संमतीपत्राचे आधारे एकुण 25,908 ₹ स्वाती राजपूत यांचे परस्पर महाराष्ट्र ग्रामीण बॅक कोंड शाखेतुन उचलून स्वाती राजपूत व शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-स्वाती राजपूत यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4),338, 336(4), 340(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:मयत नामे-शबाना गौस शेख, वय 28 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.27.07.2024रोजी ते दि.31.12.2024 रोजी 17.00 वा.पावेतो यांनी त्यांचे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- गौस फरीद शेख, खालेद फरीद शेख, जरीना खालेद शेख सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत शबाना हिस बॅकेचे कर्जाचे पैसे फेडण्यासाठी माहेरहुन 5 लाख रुपये घेवून ये असे म्हणून दिलेल्या शारिरीक व मानसिक त्रासास कंटाळून शबाना यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- समीर लियाखत आवटी, वय 30 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 85, 80, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव.”
फिर्यादी नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 27.12.2024 रोजी फिर्यादी जबाब दिली की, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रविण नरहरी इंगळे हे दोघे दि.26.12.2024 रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 मध्ये जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड, सिमेंटचा ठोकळा असलेल्या पाईपने मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रविण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकुन हल्ला केला आहे. अशा प्रकारची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होवून घटनासथ्ळाची पाहणी केली. नामदेव बालीश निकम यांचे फिर्याद जबाब वरुन अज्ञात चार लोकाविरुध्द पोस्टे तुळजापूर गु.रं.नं.591/2024 कलम 110,324(6),118(1), 126(2),352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागिंतलेली घटना यामध्ये विसंगती दिसुन येत होती. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढणेसाठी स्वत:वर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वत:ला बंदुकीचे लायसन्स मिळविणे करीता स्वत:व साक्षीदार यांचेवर पेट्रोल टाकुन,गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचे कृत्य हे फिर्यादीने स्वत:च करुन हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेची टिम, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केलेला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान