उमरगा – धम्मचारी प्रज्ञाजित यांनी लातूर व उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहाच्या अधीक्षक पदावरून समाजातील वंचित घटकांसाठी अत्यंत आदर्शवत कार्य केले आहे.आर्थिक स्थितीने ग्रासलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत जेवण, शिक्षण व राहण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ झाले असून,त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती उमरगाच्या वतीने दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी समाजरत्न पुरस्काराने लोहारा-उमरगाचे आमदार प्रवीण स्वामी,तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या तथा वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख, आ.हरीश डावरे,कैलास शिंदे, दिलीप भालेराव,रामभाऊ गायकवाड,अँड.शीतल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. याशिवाय,धम्मचारी प्रज्ञाजित यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्याचे वंदनीय कार्य सुरु केले आहे.समाजातील प्रत्येक स्तरावर समता,न्याय व बंधुता या मूल्यांची रुजवण करत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचाराला गती दिली आहे.
धम्मचारी प्रज्ञाजित यांच्या या उपक्रमांमुळे वंचित व दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळत आहे.त्यांच्या या कार्याबद्दल सा.साक्षी पावनज्योत,समाजाकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा