धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.29 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 205 कारवाया करुन 1,55,400 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-भारत लक्ष्मण भालशंकर, वय 52 वर्षे, रा.दहिवडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.29.12.2024 रोजी 19.30 वा. सु. दहिवाडी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-मनोहर बाबुराव काळे, वय 60 वर्षे, रा.अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.29.12.2024 रोजी 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घराच्या बाजूस अंदाजे 4,900 ₹ किंमतीचे 140 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-साखरबाई हिरामण शिंदे, खामकरवाडी हा.मु तेरखेडा जि. धाराशिव या दि.29.12.2024 रोजी 19.32 वा. सु. तेरखेडा ते धाराशिव जाणारे एन एच 52 रोड शेजारी अंदाजे 2,150 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-सुनिल श्रीधर बारकुल, वय 35 वर्षे, रा.नरसिंह गल्ली, येरमाळा ता. कळंब जि.धाराशिव हे दि.29.12.2024 रोजी 16.30 वा. सु. श्रीनिवास बारचे बाजूला येडेश्वरी देवी मंदीर परिसर येरमाळा येथे अंदाजे 8,900 ₹ किंमतीची 85 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-गोकुळ चांगदेव चौधरी, वय 53 वर्षे, रा. तांदुळवाडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.29.12.2024 रोजी 18.00 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 6519 ही वाशी येथील तांदुळवाडी रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रिती योगेश गालफाडे, वय 36 वर्षे, रा.छत्रपती संभाजी नगर, धाराशिव ता. जि.धाराशिव, यांचे घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.29.12.2024 रोजी 03.30 ते 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 97 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 2,91,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रिती गालफाडे यांनी दि.29.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शशिकांत माणिक गावडे, वय 30 वर्षे, रा. कोथळी ता.उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 9376 ही दि.26.12.2024 रोजी 06.30 ते 07.00 वा. सु. कोथळी शिवारातील शेत गट नं 186 मधुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिकांत गावडे यांनी दि.29.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- विशाल सुभाष पवार, रमेश सायबा पवार, अविनाश सुभाष पवार,भाग्यश्री रमेश पवार, विकास अशोक पवार, दादा शिवाजी पवार, आकाश अशोक पवार, प्रकाश संतोष पवार,अशेक कल्याण पवार, नारायण संतोष पवार, शांतीलाल सायबा पवार सर्व रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि.28.12.2024 रोजी 18.00 वा. सु. कसबे तडवळा येथे बसस्थानक समोर फिर्यादी नामे-तेजस्वीनी आबा पवार, वय 20 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घरासमोरुन जाण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तेजस्वीनी पवार यांनी दि.29.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2),190,191(2),74, 352, 351(2),351(3) सह अपंग व्यक्ती अधिनियम कलम 92 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- तानाजी भाउ पवार, आबा भाउ पवार, पोपट बाबु पवार, शिवा तानाजी पवार, फुलचंद किसन पवार, शाहु किसन पवार, लिंबा भाउ पवार, रेखा तानाजी पवार,गुरु सर्व रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि.28.12.2024 रोजी 18.00 वा. सु. कसबे तडवळा येथे बसस्थानक समोर फिर्यादी नामे-रमेश सायबा पवार, वय 27 वर्षे, रा कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी भाग्यश्री यांना नमुद आरोपींनी गावी तडवाळा येथे येण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांडा, फायटरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रमेश पवार यांनी दि.29.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2),189(2),190,191(2),191(3), 352, 351(2),351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ लैंगीक अत्याचार.”
कळंब पोलीस ठाणे :एका गावातील 21 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि.08.07.2024 रोजी 12.30 ते दि.12.11.2024 रोजी 13.00 वा. सु. घरी असताना गावातील एका तरुणाने तिस फोनकरुन माझे आईने तुला घरी बोलावले आहे असे सांगुन बोलावून घेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार करुन तिस बदनामी करण्याची धमकी दिली. यावरुन पिडीतीने दि.29.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-63(अ),64(2)(म), 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-उमाकांत लक्ष्मण गायकवाड, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्यांची स्कुटी क्र एम.एच. 25 ए.जी. 7907 वर मयत नामे-आप्पा भैरु सलगर यांना पाठीमागे बसवून चिवरी येथे सोडतो असे म्हणून स्कुटीवरुन जात होते. दि. 01.11.2024 रोजी 10.30 वा. सु.चिवरी शिवारातील पोपट पाटील यांचे शेताजवळ आरोपी नामे उमाकांत गायकवाड यांनी त्यांचे ताब्यातील स्कुटी ही हायगयी व निष्काळजीपणे चालवल्याने पाठीमागे बसलेले आप्पा सलगर हे स्कुटीवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भैरवनाथ सलगर, वय 33 वर्षे, रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1),281, 125(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील