धाराशिव (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा करण्यात आला.यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साखळे,जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ.जी.आर.परळीकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र.बा.कुटे,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत साळी,वैद्यमापन शास्त्र निरीक्षक अ.म. पवार,ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष अनील पाटील,अशासकीय सदस्य सर्वश्री रवींद्र शिराळ,शरद वडगावकर,रविशंकर पिसे,संतोष केंदळे,अश्रूबा घोडके व के.बी.काकासाहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील त्याबाबत कुठे तक्रार करावी,त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे,याची सर्व माहिती लोकांना देणे महत्वाचे असल्याचे मत यावेळी ग्राहक दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी ए.सी.भंडगर,अमोल आडेकर,बालाजी ढवण,शिवाजी कदम,ए.व्ही.मोरे,व्ही.के.कदम,व्ही.एस.शितोळे,एस.ए,जमादार व यशोदा सुरनूर आदी कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक श्रीमती साकळे यांनी केले.संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले.उपस्थितांचे आभार अक्रम मनेर यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला