धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 199 कारवाया करुन 1,66,050 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.” तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-तोळाबाई धनाजी शिंदे, वय 55 वर्षे, रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.23.12.2024 रोजी 19.10 वा. सु. सोलापूर ते तुळजापूर रोडलगत असलेले शब्बीर शेख यांचे शेतातील पत्र्याचे शेडचे बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.23.12.2024 रोजी 12.00 ते 17.00 वा. सु. पो ठाणे वाशी हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-दिलीप किसनराव पवार, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 12.00 वा. सु.पारा येथे मुख्य चौकात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 790 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावेळी आरोपी नामे-महादेव बळीराम सुकाळे, रा.पिंपळगाव लिंग्गी, ता. वाशी जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. गावातील आपल्या पत्र्याचे शेडसमोर सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 530 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.23.12.2024 रोजी 21.05 वा. सु. पो ठाणे येरमाळा हद्दीत येरमाळा रेस्ट हाउसच्या शेजारी पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुभाष गणेश लिढोरिया, वय 34 वर्षे, रा.वडार गल्ली, येरमाळा, ता. कळंब जि.धाराशिव हे 21.05 वा. सु.येरमाळा रेस्ट हाउसच्या शेजारी पत्र्याचे शेडमध्ये टायगर मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,060 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.23.12.2024 रोजी 13.10 ते 14.00 वा. सु. पो ठाणे मुरुम हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-विठ्ठल विश्वनाथ फडताळे, वय 50 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.10 वा. सु.फैमस ज्युस सेंटरचे पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 10,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावेळी आरोपी नामे-दिगंबर बलभिम लोहार, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.00 वा. सु. बागवान यांचे भाजीचे गाड्याजवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,780 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
मुरुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मलम्मा काशीनाथ माळी(उनाळे), वय 50 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांचे व त्यांचे गल्लीत राहणारी महानंदा चंद्रकांत फुलमाळी, यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.21.12.2024 रोजी 21.00 ते दि. 22.12.2024 रोजी 07.00वा. सु. तोडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम 15,000₹ व विजयकुमार भिमाशंकर मुळजे होंडा युनिकॉर्न मोटरसायकल एमएच 25 एबी 7936 असा एकुण 1,94,900 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मलम्मा माळी(उनाळे) यांनी दि.23.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मिराबाई लहु काळे, वय 52 वर्षे, रा. भोनगिरी ता.भुम जि. धाराशिव यांचे गायरान जमीन भोगनिरी शेतशिवार येथील एक म्हैस,एक शेळी व एक बोकड अंदाजे 50,000 ₹ किंमतीचे दि.20.12.2024 रोजी 17.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मिराबाई काळे यांनी दि.23.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-महादेव आण्णासाहेब जाधव, वय 41 वर्षे, रा. खुंटेवाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतात शेतगडी म्हणून कामास असणारे आरोपी नामे- परमेश्वर तुकाराम कुटे,देवराव गणपत कुटे दोघे रा.पिंपरखेड ता. हदगाव जि. नांदेड यांनी दि.21.12.2024 रोजी 22.00 ते दि.22.12.2024 रोजी 08.00 वा. सु.महादेव जाधव यांचे खंडेवाडी शिवारातील शेत गट 275 मधील स्प्रिंकलर चे 30 नोजल व एक मोबाईल फोन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव जाधव यांनी दि.23.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे. “मारहाण.”
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रवीण पांडूरंग खरसडे, रा. तांदुळवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.21.12.2024 रोजी 21.30 वा. सु.तांदुळवाडी येथे फिर्यादी नामे-दत्तात्रय पांडुरंग खरसडे, वय 55वर्षे, रा. तांदुळवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शिवीगाळ का करतो असे विचारण्याचे कारणावरुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन डावा हात पिरगाळून ढकलून दिल्याने गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय खरसडे यांनी दि.23.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 352, 351(2),351 (3),अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-मुरलीधर काळे व त्यांची पत्नी यांनी दि.21.12.2024 रोजी 15.00 वा. सु. दुकानात हनुमान चौक धाराशिव ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-रामेश्वर भैरु सांरग, वय 28वर्षे, रा. माळकरंजा ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. हनुमान चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने त्यांचे मालकीचे पत्र्याचे शेड मध्ये स्फोटक पदार्थ ठेवून ते माहित असताना त्याबाबत रामेश्वर सांरग यांना कोणतीही माहित न देता शेडमधील लोखंडी पाईप ग्रॅन्डर मशीनने कट करण्यास सांगितले. व त्यातुन निर्माण झालेल्या ठिंणग्यामुळे शेड मध्ये स्फोट होवून रामेश्वर सांरग यांचे संपुर्ण शरीर भाजून जखमी करण्यास कारणीभुत झाले आहेत. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामेश्वर सांरग यांनी दि.23.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 288, 125(ब), 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदगनर पोलीस ठाणे :आरोपी नामे-साकेत सुशील सरवदे, मनीषा सुशील सरवदे, सुशील सरवदे रा. संभाजी नगर, काकडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.23.12.2024 रोजी 20.30 वा. सु.संभाजी नगर काकडे प्लॉट धाराशिव येथे फिर्यादी नामे-सुरेंद्र महादेव रणदिवे, वय 52 वर्षे, रा. संभाजी नगर काकडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव ह.मु. जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेंद्र रणदिवे यांनी दि.23.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला