नांदेड (अंकुश पोवाडे) – भारतीय संविधानावर आघात करून,सामाजिक स्वाथ्य बिघडविणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात मौनव्रत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणी येथे भारतीय संविधानाची तोडफोड करून राष्ट्रीय ग्रंथाचा अपमान केला आणि पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठाडीत मृत्यू प्रकरणी आठवडाभर नांदेड व मराठवडा अशांत आहे. शांतता व सुव्यवस्था, सामाजिक स्वाथ्य बिघडविणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात उभ राहण्याची गरज आहे. दि.१८ डिसेंबर २०२४ वार बुधवार रोजी सकाळी ११ वाजता महात्मा ज्योतिबा फुले स्मारक,आय.टी.आय.जवळ नांदेड येथे अपप्रवृत्ती विरोधात मौनव्रत करण्यात येणार आहे. याप्रसंगी बौद्ध,शीख,मुस्लिम,इसाई धर्माचे धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ते मौनव्रत करणार आहेत. भारतीय संविधान मानणाऱ्या नागरिकांनी मौनव्रतामध्ये सहभागी व्हावं अस आवाहन संयोजकांनी केले आहे.
More Stories
कळंबच्या डॉ.संपदा रणदिवे यांना बीएएमएस पदवी;नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
विनोद कोल्हे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान
बाप,बाबा,वडील!