कळंब-ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत खरी कमाई हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला चालना देण्यासाठी साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी शिवकुमार चोंदे, सर्वेश लोमटे यांनी वेगवेगळे पदार्थ फळे विक्री केली. शाळेतील इतर विद्यार्थी व पालक यांनी स्टॉल लावलेल्या विद्यार्थ्याकडून खरेदी केली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षका श्रीम.कावळे एल. आर,सहशिक्षक बारकुल एम.बी, वाघमारे बी.टी,बन डी.एस, श्रीम.वाघमारे एस.एम, श्रीम.सगरे एस. बी,जगताप एम.पी,मुंडे के.यु.या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
More Stories
12 फेब्रुवारी : कामगारांचा देशव्यापी संप यशस्वी करा
संस्थामाता सुमनताई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे उत्साहात वितरण
साक्षी कोचिंग क्लासेसमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांचे उत्साहात स्वागत