धाराशिव (जिमाका) – परिवहन विभागाकडून ऑनलाईन फेसलेस पध्दतीने शुल्क भरणा करुन आकर्षक/पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.ही सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरुपाची आहे.अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करुन किंवा मोबाईलद्वारे ओटीपी घेवून https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करुन नोंदणी क्रमांक आरक्षित करता येतो. सद्यस्थितीत नवीन मालिका सुरु झाल्यानंतर होणारी लिलावाची कार्यपध्दती पुर्वीप्रमाणेच ऑफलाईन राहील.विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका (NEW SERIES) सुरु झाल्यानंतर प्रथम कार्यालयामार्फत आकर्षक/ पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील.त्यामध्ये पसंतीच्या/आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रीया कार्यालयीन स्तरावर पूर्ण करुन जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष (DD) सादर करणा-या अर्जदारास कार्यालयातील रोखपालाद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती दिली जाईल. कार्यालयातील लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नोंदणी क्रमांक ऑनलाईन फेसलेस पध्दतीने आरक्षित करण्याचे टप्पे थोड्क्यात पुढीलप्रमाणे आहेत Visit Website:- https://fancy.parivahan.gov.in/ Click On: New User? Register Now Complete registration by verifying your Email id or Mobile Number via OTP Login for registered user by User Id and Password which was received on your Email or Mobile Enter further applicant details and select choice number which was available online. Pay fees online sbi e-pay gateway and complete booking process Print E-Receipt and submit to concerned Dealer for registration वैयक्तिक मालकीच्या वाहना व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहन मालकास आकर्षक नोंदणी क्रमांक कार्यालयामार्फत देण्यात येईल.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला