August 9, 2025

लोकशाहीच्या संरक्षणार्थ “भारत जोडो अभियानचा ” हा स्तुत्य उपक्रम – आमदार कैलास पाटील

  • कळंब – “भारत जोडो” अभियानाच्या माध्यमातून देशभरातील सामाजिक एकोपा,बंधुता,आणि एकात्मता यांना चालना मिळत आहे.या उपक्रमाने नागरिकांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
    सध्याच्या काळात,समाजातील फुटीर प्रवृत्ती आणि द्वेष याविरोधात सर्वसमावेशक विचार आणि एकजुटीचा संदेश देणे अत्यंत आवश्यक असून लोकशाहीच्या संरक्षणार्थ “भारत जोडो अभियानचा” हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन कळंब-धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
    सत्ता,संपत्ती,जात,धर्मांधतेच्या जोरावर लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्या प्रवृत्तींच्या निषेधार्थ तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य,न्याय,बंधुता आणि धर्मनिरपेक्षता व मूलभूत अधिकार संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात महात्मा फुले वाड्यात २८ नोव्हेंबर २०२४ पासून तीन दिवसांचे आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे.
    डॉ.आढाव यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत भारत जोडो अभियान धाराशिवच्या वतीने कळंब येथे तहसील कार्यालयासमोर दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
    या वेळी आमदार कैलास पाटील हे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते.
    आ.पाटील पुढे म्हणाले की,
    “देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मूल्यांना जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी देशसेवा आहे.”
    संबंधित मागण्या मांडत भारत जोडो अभियानच्या वतीने
    आ.कैलास पाटील यांच्या हस्ते तहसीलदार प्रतिनिधी मंडळ अधिकारी गणेश जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले.
    याप्रसंगी महाराष्ट्र लोक विकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर,भारत जोडो अभियान जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके,तालुका समन्वयक साथी बंडू ताटे,शहर समन्वयक साथी माधवसिंग राजपूत,शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुसद्देक काझी यांनी
    संविधान मूल्यांचे रक्षण, सामाजिक समता आणि लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले व उपोषणाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा दृढसंकल्प व्यक्त करण्यात आला.
    या कळंब – “भारत जोडो” अभियानाच्या माध्यमातून देशभरातील सामाजिक एकोपा,बंधुता,आणि एकात्मता यांना चालना मिळत आहे.या उपक्रमाने नागरिकांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
    सध्याच्या काळात,समाजातील फुटीर प्रवृत्ती आणि द्वेष याविरोधात सर्वसमावेशक विचार आणि एकजुटीचा संदेश देणे अत्यंत आवश्यक असून लोकशाहीच्या संरक्षणार्थ “भारत जोडो अभियानचा” हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन कळंब-धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
    सत्ता,संपत्ती,जात,धर्मांधतेच्या जोरावर लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्या प्रवृत्तींच्या निषेधार्थ तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य,न्याय,बंधुता आणि धर्मनिरपेक्षता व मूलभूत अधिकार संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात महात्मा फुले वाड्यात २८ नोव्हेंबर २०२४ पासून तीन दिवसांचे आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे.
    डॉ.आढाव यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत भारत जोडो अभियान धाराशिवच्या वतीने कळंब येथे तहसील कार्यालयासमोर दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
    या वेळी आमदार कैलास पाटील हे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते.
    आ.पाटील पुढे म्हणाले की,
    “देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मूल्यांना जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी देशसेवा आहे.”
    संबंधित मागण्या मांडत भारत जोडो अभियानच्या वतीने
    आ.कैलास पाटील यांच्या हस्ते तहसीलदार प्रतिनिधी मंडळ अधिकारी गणेश जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले.
    याप्रसंगी महाराष्ट्र लोक विकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर,भारत जोडो अभियान जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके,तालुका समन्वयक साथी बंडू ताटे,शहर समन्वयक साथी माधवसिंग राजपूत,शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुसद्देक काझी यांनी
    संविधान मूल्यांचे रक्षण, सामाजिक समता आणि लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले व उपोषणाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा दृढसंकल्प व्यक्त करण्यात आला.
    या उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट व कळंब तालुका हमाल मापाडी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
    यावेळी आ.कैलास पाटील,महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर,भारत जोडो
    जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके,तालुका समन्वयक साथी बंडू ताटे,शहर समन्वयक साथी माधवसिंग राजपूत,आर.पी.आय खरात गटाचे जिल्हाकार्याध्यक्ष महावीर गायकवाड,डॉ.बाळकृष्ण भवर,सागर मुंडे,भारतीय बौद्ध महासभेचे सी.आर.घाडगे,मारुती गायकवाड,अँड.व्ही.डी.राऊत
    ,अँड.आर.बी.कांबळे,मधुकर काकडे,केरबा देडे,शिवाजी आडसूळ,अनंत सोनवणे,विलास गोडगे,विलास कदम,बालाजी शेंडगे,हमीद कुरेशी,प्रा.अविनाश घोडके आदींच्या निवेदनात स्वाक्षऱ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट व कळंब तालुका हमाल मापाडी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
    यावेळी आ.कैलास पाटील,महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर,भारत जोडो
    जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके,तालुका समन्वयक साथी बंडू ताटे,शहर समन्वयक साथी माधवसिंग राजपूत,आर.पी.आय खरात गटाचे जिल्हाकार्याध्यक्ष महावीर गायकवाड,डॉ.बाळकृष्ण भवर,सागर मुंडे,भारतीय बौद्ध महासभेचे सी.आर.घाडगे,मारुती गायकवाड,अँड.व्ही.डी.राऊत
    ,अँड.आर.बी.कांबळे,मधुकर काकडे,केरबा देडे,शिवाजी आडसूळ,अनंत सोनवणे,विलास गोडगे,विलास कदम,बालाजी शेंडगे,हमीद कुरेशी,प्रा.अविनाश घोडके आदींच्या निवेदनात स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!