August 9, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

  • मोहा – शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्ती ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिनाच्या रूपात उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप हे होते तर पर्यवेक्षक प्रा. सुनील साबळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मराठी विभागाचे प्रा.राहुल भिसे यांच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना श्रावणी वीर,राधिका मडके,प्रिया भोंडवे, प्रथमेश माळी तसेच आदित्य कसबे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यानंतर प्रा.शेखर गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी अध्यक्षीय समारोप प्राचार्य संजय जगताप यांनी केला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले तर आभार प्रा.नवनाथ करंजकर यांनी मानले.
error: Content is protected !!