डिकसळ – श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी रणजित रमेश आडसकर यांच्या प्रेरणेने शारदा इंग्लिश स्कुल,डिकसळचे प्राचार्य गिफ्टसन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी स्कुल मध्ये माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी केज येथील लोकनेते बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे राऊत सर यांनी प्रमुख अतिथी म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य गिफ्टसन यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका दिपाली गायकवाड यांनी केले तर सहशिक्षिक सूरज भोजने यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास व्यवस्थापण विभागातील दिपक पवार व स्कुलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश