वाशी- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आणा) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक,तत्वज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील विद्वान होते. शिक्षक दिन कधी?आणि का साजरा केला जातो? शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येकांच्या जिवनामध्ये गुरुंचे स्थान असते तसेच या संस्थेचे सर्वेसर्वा म्हणजे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी म्हणजे आमचे आण्णा यांचे कार्य म्हणजे संस्थेतील सर्व कर्मचाऱ्याचे उर्जास्रोत होय.’गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याच महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. असे प्रतिपादन प्रकारचे प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख सुहास जगताप यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर समारोप प्रशालेचे सहशिक्षक संतोष बोडके यांनी केले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले,संतोष बोडके शिक्षकेत्तर पत्रकार शिवराम शिंदे,लहु फुरडे आदिंनी उपस्थीत राहून कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित