August 9, 2025

इटकूर येथे नवागत प्रवेश उत्सव व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा

  • इटकूर (अमोल रणदिवे ) – कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील,जि.प.धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या उपस्थित साजरा.
    शाळेचा पहिला दिवस १५ जून २०२४ रोजी इटकूर येथे अभिनव उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पहिली प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची आमदार कैलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष आणि शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी स्वतः बैलगाडी चालवत मुलांना सोबत घेऊन पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोबत गावातील वारकरी मंडळाचे पथक हे विशेष आकर्षण होते. पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल संस्मरणीय राहावे म्हणून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.
    त्यानंतर जिल्हा परिषद कें. प्रा. शाळा व प्रशाला इटकूर यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी दहावी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.
    नवोदय धारक 4 विद्यार्थी
    आदित्य वाल्मीक कोळी,मानसी मधुकर तोडकर, सोहम सूर्यकांत तांबारे,हर्ष श्रीअंश पांगळ व एन्. एम्.एम्.एस्. शिष्यवृत्ती धारक
    आदित्य महेश देवकर,वैष्णवी विक्रम आडसूळ,प्रीती प्रदीप गाडे, सिद्धी संतोष कानडे, प्रांजली तुकाराम आडसूळ,दिव्या वाल्मीक कोळी, आसावरी अमोल रणदिवे, सार्थक सुरेश सावंत
    एस्. एस्. सी. परीक्षा गुणवंत
    वैष्णवी पोपट आडसूळ – 95.20%,अंजली मधुकर आडसूळ – 93.20%,ज्ञानेश्वरी बाबासाहेब आडसूळ – 93.20%, वैभव हनुमंत कस्पटे – 92.60%
    या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, आमदार कैलास पाटील व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी शाळेतील वाचनालयाचे विशेष कौतुक करून प्रशालेसाठी उपयोगी 100 पुस्तके भेट दिली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गाडे उपस्थित होते. प्रास्ताविकपर मनोगत लक्ष्मण आडसूळ यांनी केले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांवर विशेष भर देण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच आमदार कैलास पाटील यांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगून उपस्थितांना आश्वस्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली यादव , कीर्ती आडसूळ यांनी केले.
error: Content is protected !!