कळंब – येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा दि.१८ जून २०२४ रोजी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत बारावी विज्ञान व कला शाखेचा उत्कृष्ठ निकाल लागला.दोन्ही शाखांच्या १२ वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेवा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे,कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे व प्राचार्य शशिकांत जाधवर यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत कु.कवडे सोनिया सुभाष हिने 76.83 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम आली.73 टक्के घेऊन दुसरा क्रमांक कराड दिपक नरसिंग याने मिळविला व तृतीय क्रमांक 71.33 टक्के घेऊन कोरे काशी विश्वेश्वर चनबस याने मिळविला तसेच कला शाखेतून 78.50 टक्के गुण प्राप्त करून कु.सावंत आरती शहाजी याने प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्र.70 टक्के गुण प्राप्त करून कु.धावारे स्नेहल उत्तरेश्वर हित याने मिळविला व 65.17 टक्के अक प्राप्त करून कु.शिंदे अक्षता शशिकांत याने तृतीय क्रमांक मिळविला.यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत पाल्यासोबत त्यांच्या पालकांचे सुद्धा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच विशेष सत्कार म्हणून महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी कराड दिपक ज्याने नीट 2024 च्या परिक्षेत 690 गुण घेऊन एमबीबीएस मेडिकल कॉलेजमध्ये आपले स्थान पक्के केले.व आपल्या महाविद्यालयाचे नाव लौकिक केले.कार्यक्रमांचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.सुत्र संचालन प्रा.विजय घोळवे याने केले प्रास्ताविक प्रा.राजाभाऊ चोरघडे तर आभार डॉ.अनिल जगताप यानी केले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले