नांदेड – वर्सटाईल शोतोकॉन फॉऊडेंशन मुंबई ,आरोग्य रक्षक बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेड,विर कराटे मल्टीपर्पज फॉऊडेशन नांदेड,धाराशीव यांच्या संयुक्त विदयमाने दोन दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबीर व ब्लॅक बेल्ट ,ग्रेड बेल्ट प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन विर कराटे मल्टीपल फॉऊेडेशन संस्थापक मुख्य प्रशिक्षक सेन्साई मनोज जी. पतंगे यांनी प्रतिभा निकेतन हायस्कुल ,होळी नांदेड येथे केले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद डॉ.संतोष जटाळे यांनी भुषवीले तर प्रमुख उपस्थीतीत रत्नाकर , सिहान महावीर चव्हाण मुंबई, सेन्साई संतोष नांगरे, सेन्साई एकनाथ पाटील,सेन्साई आकाश भोरे ,सेन्साई गणेश काकडे, सेन्साई तुषार अवस्थी,सेन्साई गजानन गोंटलवार,जितेश मोहीते (तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट क्रेडीट सो.)यांची उपस्थीती होती. नांदेड ,लातुर,धाराशीव ,हिंगोली जिल्हयातील 100 खेळाडुंनी ट्रेनिंग कॅम्प चा लाभ घेतला त्यांना सिहांन महावीर च०हाण यांनी अतिशय उत्कृष्ट ट्रेनिंग देऊण माणसीक व शारीरीक दृष्टया सक्षम बनवीले . प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या खेळाडुंना बेल्ट प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तर ब्लैक बेल्ट डिग्री ट्रेनिंग कालावधी पुर्ण केलेल्या खेळाडुंना ब्लैक बेल्ट प्रदान करूण सन्मानीत करण्यात आले त्यात साईराज अनिल माने,मृणाल राजकुमार गंगावणे, पार्थ नितीन पाटील , वैष्णवी रवींद्रसिंग चंदेले अनविष नाझीमाली शेख या तिन मुलांना व दोन मुलींनी प्रशिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण करूण ब्लॅक बेल्ट प्राप्त केला . कार्यक्रम यशस्वी ते करिता सेम्पाई संगम बोरकर सेम्पाई अरुण कळसाई,सेम्पाई सृष्टी पांचाळ यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचलन संतोष नांगरे यांनी तर आभार मनोज पतंगे यांनी व्यक्त केले . सर्वत्र खेळाडुंचे कौतुक होत आहे.
More Stories
कळंबच्या डॉ.संपदा रणदिवे यांना बीएएमएस पदवी;नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
विनोद कोल्हे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान
भारतीय संविधानावर आघात; बुधवारी संत महंतासह मौनव्रत