August 8, 2025

शिराढोण येथे खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न

शिराढोण (महेश फाटक ) – कळंब तालुक्यातील शिराढोण येथे खरीप पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी शिराढोण अंतर्गत सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते. सदर बैठकीत पाखरे आर.डी. कृषी सहाय्यक यांनी बीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रियेसाठी कोणती औषधे घ्यावी कोणते औषध काय काम करते बुरशीजन्य औषध कोणते आहे कीटकनाशकांसाठी कोणते औषध काम करते याविषयी सविस्तर अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगितली. अडसूळ एस एस कृषी पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ कृषी अधिकारी यांनी बियाणे उगवण क्षमता का करावी उगवण क्षमता तपासणे हे गरजेचे का आहे उगवण क्षमता तपासणीसाठी कोणत्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात पैकी कोणती पद्धत सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायद्याची ठरते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सोबतच शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासणी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने क्षमता तपासणी करूनच पेरणी केली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील बैठकीमध्ये ग्रामपंचायत पंचायत सदस्य ज्योती महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी, कळंब भागवत सरडे यांनी सोयाबीन लागवड पद्धती बद्दल सविस्तर विवेचन केले . लागवड पद्धती मधील बीबीएफ तंत्रज्ञाने लागवड केलेली कशी फायदेशीर ठरेल याविषयी उदाहरणसह शेतकऱ्यांच्या अनुभवासह उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. त्याबरोबरच टोकन पद्धतीने लागवड केल्यानंतर रोपांची संख्या येणारे उत्पादन होणारा खर्च याविषयी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्याचे अनुभव कथन करण्यास सांगितले यामध्ये शिराढोण येथील प्रगतशील शेतकरी औदुंबर काळे यांना अनुभव सांगण्यासाठी सांगितले. सोबतच महाडीबीटीवरील विविध योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले त्यामध्ये बियाण्यासाठी अर्ज दि २४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले.
यानंतर या लागवड पद्धतीमधील येणाऱ्या अडचणी व त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील याविषयी उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सहाय्यक पद्मसिंह गायकवाड यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी कृषी विभागाच्या सल्ल्याने दूर करून आपले उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले कार्यक्रमासाठी कृषी विभागातील शिराढोण मंडळ कृषी अधिकारी अधिनिस्त सर्व कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक हजर होते. सोबतच गावातील उपसरपंच अमोल माकोडे ग्रामपंचायत सदस्य अँड नितीन पाटील व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

 

@ सर्व शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करावी सोबतच सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करावे.- भागवत सरडे
तालुका कृषी अधिकारी कळंब

error: Content is protected !!