आष्टा – विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा येथे दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळत नेतृत्वगुणांची प्रभावी झलक दाखवली. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापकपदी कु.अंकिता गिलबिले तर उपमुख्याध्यापकपदी कु.गौरी जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी शिंदे व कु.श्रावणी गिलबिले यांनी केले,तर आभारप्रदर्शन कु.वैष्णवी गिलबिले यांनी मानले. कार्यक्रमास शालेय
निरोप समारंभात आठवणींना उजाळा;शाळेला फॅनची भेट
आष्टा – विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा येथे दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळत नेतृत्वगुणांची प्रभावी झलक दाखवली. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापकपदी कु.अंकिता गिलबिले तर उपमुख्याध्यापकपदी कु.गौरी जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी शिंदे व कु.श्रावणी गिलबिले यांनी केले,तर आभारप्रदर्शन कु.वैष्णवी गिलबिले यांनी मानले. कार्यक्रमास शालेय समिती सदस्य तानाजी (मामा) गिलबिले,शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत (आबा) काकडे,सुधाकर गिलबिले,जि.प. प्राथमिक शाळेचे कातुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला सप्रेम भेट म्हणून फॅन प्रदान केला.निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम आनंद,उत्साह आणि आठवणींच्या वातावरणात पार पडला.
समिती सदस्य तानाजी (मामा) गिलबिले,शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत (आबा) काकडे,सुधाकर गिलबिले,जि.प. प्राथमिक शाळेचे कातुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला सप्रेम भेट म्हणून फॅन प्रदान केला.निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम आनंद,उत्साह आणि आठवणींच्या वातावरणात पार पडला.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन