March 26, 2026

संविधानकर्त्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यामंदिर हायस्कूलचे कृतज्ञतांजली अर्पण

  • आष्टा – दिनांक ०६ डिसेंबर २०२५,शनिवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने,तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे संविधानाचे शिल्पकार,विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

  • कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे ज्येष्ठ गणित शिक्षक शशिकांत मांजरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत डॉ.बाबासाहेबांविषयी कृतज्ञता, समता,शिक्षण व संविधान मूल्यांची जाणीव व्यक्त केली.
    या अभिवादन सोहळ्यास मुख्याध्यापक आनंद रामटेके, सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका सौ. निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे स्वरूप साधे, संयत व मूल्याधारित असे ठेवण्यात आले होते.

error: Content is protected !!