September 21, 2026

शिक्षण महर्षी मोहेकर गुरुजींच्या प्रतिमा पूजनाने विद्यामंदिरमध्ये झालं ज्ञानस्मरण

  • आष्टा– ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि.४ डिसेंबर २०२५ रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  • प्रशालेच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ.निर्मला वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाची विधीवत सुरुवात झाली.यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके, सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका सौ. निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षणमहर्षी मोहेकर गुरुजींच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!