मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.४ डिसेंबर २०२५, गुरूवार रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमास प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,सौ. उषा पांचाळ,धनंजय परजने, ज्ञानोबा टोपे,तसेच प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे आद्यपुरुष,शिक्षणाचे मार्गदर्शक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहेकर अण्णांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत कार्यक्रमाचे औचित्य साधले गेले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन