March 26, 2026

“दखल” दिवाळी अंकाचे पुण्यात प्रकाशन

  • प्राचार्य डॉ.सुधीरजी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न
  • पुणे (वारजे) – धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक गणेशराव शिंदे संपादित दिवाळी विशेषांक “दखल” चे प्रकाशन पुण्यातील पुणेरी कळंबकर ग्रुप च्या वतीने प्राचार्य डॉ.सुधीरजी कुलकर्णी (सिंहगड कॉलेज) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रकाशनाचा हा सोहळा राजेश नाना काटे पाटील कळंबकर यांच्या वारजे येथील निवासस्थानी उत्साहात पार पडला.
    या प्रसंगी डावी कडून सर्वश्री गोविंदराव देशमुख,बळवंतराव दशरथ,शरदराव देशमुख, मुकुंदराव पानसे,गो.गो.कुलकर्णी, जगदिशराव कुलकर्णी,डॉ. सुधीरजी कुलकर्णी,सुहासप्पा भडंगे,राजेश नाना काटे पाटील कळंबकर,तसेच ग्रुपचे ॲडमिन रविंद्रजी कुलकर्णी (कन्हेरवाडीकर) हे उपस्थित होते.
    अचानक आलेल्या पावसामुळे उपस्थितीवर थोडा परिणाम झाला असला तरीही कार्यक्रम आनंदात व साहित्यिक वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!