February 8, 2026

पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन

  • वाशी – दि.१८ सप्टेंबर २०२५, वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी) ता. वाशी येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे पूजन प्रशालेचे सहशिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक संतोष ढोले, संतोष बोडके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!