कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले.त्यानंतर मराठवाडा गीत सादर करण्यात आले. यावेळी प्राचार्य मुंडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व आणि त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याची प्रेरणा यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत,पर्यवेक्षक शंकर गोंदकर तसेच समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले.या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड